जून महिन्यातच गंगापूर धरणातील जलसाठा पोहोचला ६५टक्क्यावर

जून महिन्यातच गंगापूर धरणातील जलसाठा पोहोचला ६५टक्क्यावर
  • MG News
  • जून 20 2025

Share on  

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिक शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा  जून महिन्यातच ६५ टक्क्यांहून अधिकवर पोहोचला. त्यामुळे  शुक्रवारी या धरणातून विसर्ग करण्याची वेळ आली.पावसामुळे जून महिन्यात या धरणाचे दरवाजे उघडावे लागण्याची ही अपवादात्मक घटना आहे. इतक्या लवकर धरणातून विसर्ग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. धरण परिचालन सुचीनुसार जून महिन्यात धरणात किती जलसाठा ठेवायचा हे साधारणपणे निश्चित असते. गंगापूर  धरणाने ती पातळी गाठल्याने हा  विसर्ग करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार मागील २४ तासात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्र्यंबकेश्वरमध्ये १०७,. गौतमी गोदावरी ११४ आणि गंगापूर धरण परिसरात ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली .गंगापूर धरणाखेरीज  जिल्ह्यातील दारणा धरणातून ४७४२ क्युसेकचाकडवा धरणातून  ५३० क्युसेकचा, पालखेड धरणातून  ३२४० क्युसेकचा, नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १५ हजार ७७५ क्युसेकचा क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या