सोलापूर : नैराश्यातून एक तरुण आणि एका तरुणीची आत्महत्या

सोलापूर : नैराश्यातून   एक तरुण आणि एका तरुणीची आत्महत्या
  • MG News
  • जून 20 2025

Share on  

सोलापूर येथील कर्णिक नगरमध्ये एका राहत्या घरात एक तरुण आणि एका तरुणीची आत्महत्या झाल्याची घटना समोर आली आहे. रोहित भिमू ठणकेदार  आणिअश्विनी वीरेश केशापुरे असे आत्महत्या करणाऱ्याची नावे आहेत. आत्महत्येचे कारण नैराश्य आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये आम्ही जीवनाला कंटाळून आत्महत्या करत  आहोत. आमच्या आत्महत्येसाठी कोणाला जवाबदार धरू नये. असा मजकुर आहे.आत्महत्येप्रकरणी सोलापूरच्या एम आय.डी.सी पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे‌. दोघांच्या घरची आर्थिक स्थिती गरीबीची आहे.दोन्ही कुटुंबियांचा आधार आत्महत्या केलेल्या व्यक्ती होत्या.

संबंधित बातम्या