गोंदिया : अडीच महिन्याचे शेळीच पिल्लू देते दूध.

गोंदिया : अडीच महिन्याचे शेळीच पिल्लू देते  दूध.
  • MG News
  • जून 18 2025

Share on  

अडीच महिन्याचे शेळीच पिल्लू  दूध देण्याची घटना समोर आलीयेंआमगाव तालुक्यातील तिगाव  येथे सुखराम पटले ह्या शेतकऱ्याच्या घरी दोन शेळ्या असून एका शेळीने १ एप्रिल रोजी एक बकरीला जन्म दिले असून आज ते अडीच महिन्याचे झाले. काही दिवसांपूर्वी निदर्शनात आले की, ते साधारण बकरीच्या बच्चू सारखे नसून एखाद्या दूध देणाऱ्या बकरी सारखे आहे . त्याचे स्तन ओढून पाहिल्यास त्यातून दूध निघून आले. एवढंच नाही तर बकरीला शिंगही आले आहे ,दात पण निघाले असल्याचे दिसून आले. याची माहिती पशु विकास अधिकारी यांना मिळाली असता त्यांनी जाऊन बघितलं तर त्या बकरीच्या बच्चा चे दात सुद्धा सहा महिने किंवा एक वर्ष असल्यासारखे निघाले आहेत.   हे सर्व बद्दल तिच्या हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे तिच्या शरीरात घडून आले असल्याचे पशुधन विकास अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे हा चमत्कार नसून, हार्मोन्स बदलामुळे हे सर्व घटक पूर्वीच या बकरीच्या पिल्लू मध्ये आले असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या