एम जी न्यूज ही एक मराठी वृत्तवाहिनी आहे रा.जकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आध्यात्मिक घडामोडींचा आढावा घेणारी महाराष्ट्रातील २४ तास प्रक्षेपण असणारी वृत्तवाहिनी आहे. एम जी न्यूज ह्या वृत्तवाहिनीने ८ डिसेंबर २०२४ रोजी प्रारंभ केला. ह्या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक मनोहर पाटील आहेत. एमजी न्यूज नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात तीन लाख लोकांपर्यंत डेन केबलच्या माध्यमातून पोहोचते तसेच आगामी काळात महाराष्ट्रभर चॅनेलचा विस्तार केला जाणार आहे.
एम जी न्यूज ह्या वृत्तवाहिनीचे 'निर्भीड आणि सत्याची साथ ' हे ब्रीद वाक्य आहे आणि त्या नुसार वेगवेगळ्या तालुक्यातील जिल्ह्यातील प्रतिनिधी कामकाज करत असतात. सध्या नाशिक जिल्हयात डेन केबल नेटवर्क वर ८२४ या क्रमांकावर दुपारी १२ ते १ व संध्याकाळी ४ ते ५ या वेळी बातम्या प्रसारित केल्या जातात.
तंत्रज्ञानाला हाताशी घेऊन एम जी न्यूज ही वृत्तवाहिनी घराघरा पर्यंत पोहचली आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यात कायम अग्रेसर असलेली अत्यंत अल्प काळात इलेक्ट्रॉनिक मीडिया मद्ये महाराष्ट्रामध्ये नावाजलेली वृत्तवाहिनी आहे.
ताज्या बातम्या दैनदिन जीवनातील घडामोडी जनतेसमोर मांडण्यासाठी एम जी न्यूजचे मुख्य संपादक, उपसंपादक, जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, रिपोर्टर, कॅमेरा मन, एडिटर सदैव तत्पर असतात. एम जी न्यूज ने अनेक वेगवेगळे विषय हाताळून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
एम जी न्यूज आपल्या प्रेक्षकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करीत असते त्यामधे आरोग्य , अर्थ , उद्योग या वरील कार्यक्रम सादर केले जातात .
दूरध्वनी: +91 9881786561
कार्यालयाचा पत्ता: शॉप नंबर ३, आत्रेय आंगण, रेशीमबंध लॉन्स च्या बाजूला, हिरावाडी, पंचवटी, नाशिक 422003