धाराशिव जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर येते आहे. एका २४वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर तब्बल ७वर्ष अत्याचार केल्याची आणि आपले कृत्य उघडकीस येवू नये, यासाठी मुलीला जबरदस्ती गर्भनिरोधक गोळ्या खाण्यास भाग पडल्याची निंदणीय घटना जिल्ह्यातील एका गावात घडलीये. या प्रकरणी आराेपी तरुणासह त्याला मदत करणाऱ्या महिलेच्या विराेधात पाेलिसांनी १६ जून राेजी पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहेनराधमाने पिडीतेवर २०१७ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अत्याचार केला या प्रकरणी आराेपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ६४ (२)(एफ)(आय)(एम), ६९, ५५ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याचे कलम ४, ६ , १६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.