अमरावती : संत गाडगेबाबा विद्यापीठासमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अमरावती : संत गाडगेबाबा विद्यापीठासमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
  • MG News
  • जून 19 2025

Share on  

यवतमाळ येथील सावित्री ज्योतीराव फुले समाजकार्य महाविद्यालय येथील लखण अरविंद मैघणे या कर्मचारी ने महाविद्यालय येथील प्रभारी प्राचार्य डॉ अरुण शेंडे यांच्या विरोधात गेल्या 30 दिवसापासून उपोषण आंदोलनाला सुरुवात केली. अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वार समोर  उपोषणास सुरुवात केली. महाविद्यालय येथील प्रभारी प्राचार्य डॉ अरुण शेंडे यांची अंसवैधानिक पदोन्नती व प्रभारी प्राचार्य पद बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली. पात्र नसतांना सहयोगी प्राध्यापक चुकीचे प्लेसमेंट करून घेतली असा थेट आरोप उपोषण कर्ते लखण अरविंद मैघणे यांनी केला.अद्याप पर्यत विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली नाही असा सुद्धा प्रतिक्रियेतून आरोप केला आहे.

गुरुवारी कर्मचारी लखण अरविंद मैघणे यांच्या नातेवाईक विद्यापीठ विभागात दाखल झाले. येथे सुद्धा कुलगुरू सोबत चर्चा झाली नाही. अनेक वेळ पासून वाट पाहत आहे, अशी प्रतिक्रिया नातेवाईक महिलेनी व्यक्त केली. या संदर्भात कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांना विचारणा केली असता लिपिक अरविंद मैघणे यांनी बेकायदेशीर उपोषण सुरु केले.

संबंधित बातम्या