कोकणात अतिवृष्टीचा इशारा

कोकणात अतिवृष्टीचा इशारा
  • MG News
  • जून 20 2025

Share on  

कोकणातील पालघर, ठाणेमुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी, तर एखाद्या भागात तीव्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 21 जूनला पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता असून, मध्यम पाऊस कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दोन्ही दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुणे, नाशिक, सातारा या घाटमाथ्यांच्या भागात आज 20 जून रोजी काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस, तर 21 जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा आणि रस्ते बंद होण्याचा संभाव्य धोका असल्याने स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक शहर, अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूर या भागांमध्ये 20 जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या