जळगाव शहरात गुरुवारी १९ जूनला रात्री ८ वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद कार चालकाने भरधाव वेगात तिघांना धडक दिली. यामुळे ४५ वर्षीय वंदना गुजराथी या उंच फेकल्या गेल्या आणि कोसळल्या. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेच्यात कैद झाला आहे. या अपघातात अन्य दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. तर संशयित आरोपी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील महाबळ ते वाघनगर रस्त्यावर ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
महाबळ परिसरात राहणा्या वंदना सुनील गुजराथी गुरुवारी पाई जात होत्या. तेव्हाच शहराकडून वाघनगरकडे भरधाव वेगात येणाच्या कार चालकाने त्यांना ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वंदना गुजराथी १५ ते २० फूट दूर फैकल्या गेल्या. एवढ्यावरच न थांबता, मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालकाने त्याच वेगात पुढे जात आणखी दोघांना धडक दिली. त्याने वाघनगर परिसरातील काही घरांच्या बाहेरील कुंड्या आणि बाकही तुटले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रामानंद नगर पोलिसांनी तपास करून मद्यधुंद वाहनचालक मोंटू सैनी याला ताब्यात घेतले आहे. जखमी वंदना गुजराथी यांना काही नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र शुक्रवारी सकाळी ७ वाजेपुर्वी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.