गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने शासकीय धान खरेदी केंद्र बंद

गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने शासकीय धान खरेदी केंद्र बंद
  • MG News
  • जून 20 2025

Share on  

 खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते. यावर्षी रब्बी हंगामात शासनाने फेडरेशनला 11 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. तसेच शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केलेल्याच शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. गोंदिया जिल्ह्यातील 46 हजार 534 शेतकऱ्यांनी नोंदणी केली, तर यापैकी 24 हजार शेतकऱ्यांनी 11 लाख क्विंटल धानाची हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केली. तर 22 हजारावर शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहे.

बाजारपेठेत धानाचे दर कमी असल्याने शेतकरी हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी केंद्रावर नेत आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रावरील आवक वाढून लवकरच उद्दिष्ट पूर्ण झाले. उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे सध्या धान खरेदी बंद असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने हे उद्दिष्ट वाढवून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. तर यासाठी शासनाकडे 15 लक्ष क्विंटल उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती गोंदियाचे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या