आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी नो व्हेईकल झोन जाहीर केला. यानंतर मंदिरे समितीच्या माध्यमातून वयोवृद्ध भाविक, अपंग भाविक आणि व्हीआयपी साठी इलेक्ट्रिक व्हॅन उपलब्ध करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिर समितीच्या पहिल्या दोन व्हॅन होत्या. यामध्ये जाताना नव्याने दोन भाविकांनी मंदिराला इलेक्ट्रिक व्हॅन भेट दिली आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या चार इलेक्ट्रिक व्हॅन आता भाविकांना चौफाळा ते महाद्वार या परिसरातून विठ्ठल मंदिरात ने आण करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत.