येवल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंदी सक्तीला विरोध करण्यात आला. यावेळी हिंदी नकोच, हिंदी सक्ती विरोध करत येवल्यातील मनसेच्या वतीने विविध शाळांना तसे पत्रक देखील दिले. इयत्ता पहिलीपासून सक्तीची भाषा म्हणून 'हिंदी' लागू करण्याच्या निर्णयाला येवल्यातील मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली येवल्यातील विविध शाळांमध्ये पत्रक देत हिंदी सक्तीला विरोध केला.