मंत्री गिरीश महाजन यांनी गोदाघाट परिसरात केली पाहणी

मंत्री गिरीश महाजन यांनी गोदाघाट परिसरात केली पाहणी
  • MG News
  • जून 19 2025

Share on  

आज सकाळपासूनच नाशिक जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने गोदावरीला पूर आला आहे. पुरामुळे आजूबाजूची छोटी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 
गिरीश महाजन हे कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, नाशिक, त्र्यंबक मध्ये पाऊस आहे. पुढच्या वर्षी कुंभ मेळा होणार आहे. त्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या यासाठी आम्ही तयारी करत आहोत. पोलिस प्रशासन आणि महापालिकेला सांगून फलक लावणार आहोत.  गार्ड उभे करून गाड्या दुसऱ्या ठिकाणी लावण्याच्या सूचना केल्या जातील.चार पाच पुलांचे टेंडर झालेले आहेत. कुंभ मेळ्याच्या दृष्टीने अडचण होणार याची आम्ही तयारी करतो आहोत. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये ज्या चुका झाल्या आहेत, येत्या कुंभांच्या आत झालेल्या चुका दुरुस्त करू, तसेच गटारीचे पाणी गोदावरीत येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. 
तसेच कोकण आणि मुंबईत पाऊस सुरू आहे. सगळ धोक्याच्या बाहेर आहे. आमच्या सगळ्या टीम अलर्ट आहेत, पुण्यात दुर्घटना घडली तेव्हा दहा मिनिटात NDRF टीम पोहोचल्या आहेत. 

संबंधित बातम्या