बुधवार रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून पुण्यातील सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. शनवार पेठेतील घरांमध्ये तसेच हिंगणे खुर्द परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे.कोथरुड ,सिंहगडरोड, शास्त्री रोड, टिळक चौक परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. पाणी साठायला सुरवात झाल्याने मनपाच्या नाले सफाईचे पितळ उघडे पडले आहे. सुरक्षीततेचा उपाय म्हणून भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.तसेच पाणी असेच वाढल्यास, मनपा भवनाजवळील बसस्थानक बंद करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.