वांद्रे कौंटुबिक न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा मुंडे यांना १ लाख २५ हजार रूपये आणि मुलगी शिवानीला ७५ हजार रूपये पोटगी देण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी अपिल केले होते.न्यायमुर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली.