१लाख रूपयाच्या स्कुटीसाठी १५लाख रूपये मोजल्याची घटना हिमाचल प्रदेशात घडली आहे. हे अतिरिक्त १४लाख रूपये मोजले गेले आहेत वाहनाच्या आकर्षक नंबरसाठी. हिमाचल प्रदेशातील संजीव कुमार यांनी 1 लाख किमतीच्या स्कूटीसाठी तब्बल 14 लाख अधिकचे खर्चून HP21C-0001 हा नंबर मिळवला आहे.भारतातील वाहन उद्योगाचा विचार करता आकर्षक नंबरसाठी मोजण्यात आलेली ही दुसऱ्या क्रमांकाची रक्कम आहे.हिमाचल प्रदेश सरकारच्या महसुलात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.