पोलीस कर्मचाऱ्याकडूनच 10 लाखांसाठी पत्नीचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गेल्या चार वर्षांपासून पती आपला शारीरिक मानसिक छळ करत असल्याची तक्रर पीडितेने केल्यावर सदर प्रकार उघडकीस आला होता. त्यांचे पती विनोद कुटे बीड जिल्हा पोलीस दलात कार्यरत असून सध्या ते पोलीस मुख्यालयात पदस्थापनेवर आहेत. कारसाठी माहेरवरुन 10 लाख घेऊन ये, असे सांगत माझ्या पतीने माझा छळ केला, असे या तक्रारीत म्हंटले आहे