गुजरात राज्यात गेल्या ५वर्षात सिंहाची संख्या ३२टक्क्यांनी वाढली 

गुजरात राज्यात गेल्या ५वर्षात सिंहाची संख्या ३२टक्क्यांनी वाढली 
  • MG News
  • जून 20 2025

Share on  

गुजरात राज्यात गेल्या ५वर्षात सिंहाची संख्या ३२ टक्क्यांनी वाढली आहे.. जरातमध्ये सध्या सिंहांची संख्या सध्या  ८९९ झाली आहे. २०२० मध्ये ही संख्या ६७४ होती. गुजरात सरकारनं १० ते १३ मे  दरम्यान राज्यातील सिंहाची गणना केली. या गणनेच्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर येत आहे. पण, धक्कादायक म्हणजे अर्धे सिंह राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांसारख्या संरक्षित वनक्षेत्रात नसून मानवी वस्ती असलेल्या भागात राहतात.
अधिकृत आकडेवारीनुसार, २०२० पर्यंत सौराष्ट्र प्रदेशात ३०  हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात सिंह होते आणि २०२५ पर्यंत हे क्षेत्र 35 हजार चौरस किलोमीटरपर्यंत वाढलं. हे वाढीव क्षेत्र राष्ट्रीय उद्याने, अभारण्ये यांचे नसून नागरी आहे.त्यामुळे गावात सिंह येत असल्याची तक्रार स्थानिक करतात. आमच्या गावात रस्त्यांवर सिंह फिरत असल्याचं काही गावातील ग्रामस्थ सांगतात., त्यामुळे  सौराष्ट्रातील लोकांना त्यांची जीवनशैली आणि अधिवास बदलावा लागला आहे. तसेच  मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष वाढण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या