दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या असून नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयित व्यक्तींची यादृच्छिक झडती घेतली जाईल. तसेच ग्राऊंड इंटेलिजन्स नेटवर्क सक्रिय करण्यात आले आहे. संवेदनशील भागात गस्त वाढविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
गेल्या चार दिवसात, म्हणजे 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दिल्लीमध्ये काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये झालेल्या या स्फोटाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचसोबत आर्थिक राजधानी मुंबईमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.