दिल्ली: लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये स्फोट:१३ जणांचा मृत्यू, २४ जखमी

दिल्ली: लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये स्फोट:१३ जणांचा मृत्यू, २४ जखमी
  • MG News
  • नोव्हेंबर 10 2025

Share on  

 दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एक मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एक कार उभी होती, त्या कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. या स्फोटात काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, त्यामागचं कारण काय याचा तपास केला जात आहे.

सोमवारी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेचच फायर ब्रिगेड या ठिकाणी पोहोचलं आणि त्यांनी मदत कार्य सुरू केलं. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त 800 मिटर अंतरावर आहे. त्यामुळे या स्फोटाकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात आहे.

लाल किल्ल्याचा हा परिसर म्हणजे नेहमीच गजबजलेला असतो. विशेषतः सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. अशावेळी हा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. 
 

संबंधित बातम्या