नाशिक शहरातील येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत पारंपरिक सेवक ह. भ. प. श्री. सतीश महाराज अलई यांची अखिल भाविक वारकरी मंडळ, महाराष्ट्र यांच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. सुधाकर महाराज इंगलें (सोलापूर), प्रदेश अध्यक्ष ह. भ. प. ज्योतीराम चांगभले व नाशिक जिल्हा अध्यक्ष ह. भ. प. अण्णा महाराज आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीस नाशिक शहराध्यक्ष ह. भ. प. गोकुळ महाराज शिंदे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ह. भ. प. सतीश महाराज अलई हे गोविंद नगर नाशिक येथील असून, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीचे स्वागत जिल्हाध्यक्ष ह. भ. प. अण्णा महाराज आहेर,सह जिल्हाध्यक्ष भरत महाराज वाघ, जिल्हा उपाध्यक्ष विलास महाराज सांगळे, कार्याध्यक्ष बापू महाराज ठाकरे, संपर्क प्रमुख विजय महाराज देवरे उमराणे, संपर्क प्रमुख शिवाजी महाराज खांडबहाले, संपर्क प्रमुख भिमाशंकर महाराज राऊत, शहराध्यक्ष ह. भ. प. गोकुळ महाराज शिंदे, नाशिक विभागीय अध्यक्ष ह. भ. प. भगवान महाराज शिंदे, पंचवटी विभागीय अध्यक्ष ह. भ. प. अशोक महाराज बोढाई, मध्य विभाग अध्यक्ष ह. भ. प. एकनाथ महाराज जाधव, महिला वारकरी समिती जिल्हाध्यक्षा ह. भ. प. सुमन बाळासाहेब शिंदे, महिला शहराध्यक्षा सौ.सुलभाताई शेळके, महिला वारकरी समिती शहराध्यक्षा सौ. सुनिताताई गंभिरे, सातपूर महिला शहराध्यक्ष हभप सुमन ताई पाटील,शहराध्यक्षा सौ. महिला तालुका अध्यक्षा सौ. सुभद्रा पाटील, तालुका अध्यक्ष ह. भ. प. हरीभाऊ महाराज हेडे, उपाध्यक्ष ह. भ. प. केवळ महाराज, संपर्क प्रमुख ह. भ. प. मंगेश महाराज पेडणेकर, ह. भ. प. शंकर महाराज लांडे, ह. भ. प. आनंद महाराज दिवटे, ह. भ. प. राजन महाराज, ह. भ. प. संजय शिंदे, निलुत पिपासे आदींनी व्यक्त केला.
संपर्क प्रमुख ह. भ. प. मंगेश महाराज पेडणेकर यांनी सांगितले की, “ह.भ.प. सतीश महाराज अलई हे समाजप्रबोधन, वारकरी परंपरेचा प्रसार आणि कीर्तन भजनातून समाज प्रबोधन करण्यासाठी कार्यरत असतात. त्यांच्या निवडीमुळे संघटनेला नवी ऊर्जा मिळेल.”
ह. भ. प. श्री सतीश महाराज अलई यांनी आपल्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.श्री. जोतिराव महाराज चांगभले ,जिल्हाध्यक्ष ह. भ. प. आण्णासाहेब महाराज आहेर, शहराध्यक्ष हभपश्री गोकुळ महाराज शिंदे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की -
> “वारकरी संप्रदायातील भक्ती, साधना आणि समाजसेवेचा हा वारसा अधिक व्यापक करण्यासाठी मी संपूर्ण मनःपूर्वक कार्य करीन.”
या निवडीबद्दल ह. भ. प. श्री सतीश महाराज अलई यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.