नाशिक गुन्हे शाखा (अंबड पथक) यांच्या उल्लेखनीय कामगिरीत खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी रोहित थापा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित थापा हा पुण्यात लपून बसला असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या अंबड पथकाला मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पुणे परिसरात सापळा रचून आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. सदर आरोपीवर नाशिक शहरातील गंभीर गुन्हे दाखल असून तो दीर्घकाळ फरार होता.
अटक ठिकाण: ससाणेनगर, हडपसर, पुणे
अटक केलेला आरोपी: रोहित थापा (वय २२ वर्षे)
गुन्हे नोंद: खूनासह गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग
सदरची कामगीरी मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त. गुन्हे, मा.श्री. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त. गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपुत, पोउनि. मोतीलाल पाटील, श्रेपोउनि. दिलीप सगळे, सपोउनि. सुहास क्षिरसागर, पो.हवा. प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे व मपोअं. सविता कदम, नेम. अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा अंबड पथकाची आणखी एक उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी ठरली असून, फरार आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी महत्त्वाचा गुन्हा उकलण्यात यश मिळवले आहे.