नाशिक शहरातील वाढत्या चोरी, घरफोडी व शारीरिक गुन्ह्यांवर अंकुश आणण्यासाठी पोलिस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिकरोड गुन्हे शाखा युनिटकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दोन सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास सुभाष रोड परिसरात झालेल्या एका फिर्यादीच्या घरफोडी प्रकरणाचा तपास करताना नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
नाशिकरोड येथे जेवण करून फिरत असताना नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार टोनू पाईकराव, गणेश पाईकराव, प्रथमेश कसबे, अनुराग हिरे उर्फ झम्प्या, दानिश शेख, क्रिश पाईकराव, गणेश पाईकराव व सुरज भालेराव व इतर आरोपींनी तक्रारदार यांच्या पोटाला पिस्तूल लावून, धाक दाखवून, खिशामध्ये हात घालून खिशातील रुपये ११००/- बळजबरीने काढून घेतले. तसेच फिर्यादी यांना धारदार हत्याराने डोक्यात पाठीमागून मारहाण लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच फिर्यादी यांच्यासोबत असणारा रोहन जाधव याला देखील धारदार हत्याराने डोक्यास मारहाण करून व खिशातील ८०० रुपये बळजबरीने काढून घटनास्थळावरून चोरी करून पळुन गेले होते म्हणून नाशिकरोड पोलीस ठाणे येथे गुरक्र ५६३/२०२५ बीएनएस कलम ३११, ३१०(२), ३५१(२), भाहका ३/२५, ४/२५ सह मपोका १३५ प्रमाणे दिनांक ०७/११/२०२५ रोजी ०५:२४ वाजता गुन्हा दाखल झालेला होता.
या गुन्हयामध्ये मुख्य आरोपी टोनु पाईकराव याला पोलीसांनी पाठलाग करून घटनास्थळावरून ताब्यात घेतलेले होते परंतु त्याचे साथीदार हे घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले होते. क्रिश दिपक पाईकराव व गणेश भारत पाईकराव हे गुन्हा घडल्यापासुन फरार होते.
आरोपींना नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखा यांनी यशस्वीपणे अटक करून पुढील कार्यवाहीसाठी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
हि उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, नाशिक श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. किरणकुमार चव्हाण व मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक श्री. संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड गुन्हे शाखा युनिटचे प्रभारी अधिकारी पोउनि संदिप पवार, श्रेणी पोउनि प्रेमचंद गांगुर्डे, श्रेणी पोउनि दिलीप भोई, मसपोउनि मंगला जगताप, पोह अविनाश देवरे, पोह दत्तात्रय चकोर, पोना मंगेश जगझाप, पोशि संजय पोटींदे, पोशि भरत राऊत यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.