दि. ०३/११/२०२५ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास बेथेलनगर, शरणपूर परिसरात राहुल पवार व त्याचे इतर ५ ते ६ साथीदार यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून, आरोपीतांनी त्यांच्या हातातील कोयते, चॉपर, दांडके अशा हत्यारांनी गल्लीत उभ्या असलेल्या रिक्षा, मोटार सायकल यांच्या काचा फोडून काचेच्या बाटल्या घरावर फकून गल्लीतील लोकांना शिवीगाळ करून, धमकावून गल्लीत दहशत माजवून गोळीबार केला. त्यातील एकाने फिर्यादी यांना "तुझा गेमच वाजवतो" असे धमकावून खून करण्याच्या हेतूने तक्रारदार यांच्यावर कोयता उगारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी शरणपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते. त्यापैकी मुख्य आरोपी राहुल पवार हा नांदगाव येथे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट क्र. १ च्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नांदगाव येथे सापळा रचून आरोपी राहुल पवार यास अटक केली.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोउनि चेतन श्रीवंत, पोउनि सुदाम सांगळे, श्रेणी पोउनि किरण शिरसाठ, पोहवा महेश साळुंके, उत्तम पवार, पोअं राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, नितीन जगताप, गोरक्ष साबळे, राम बर्डे, उत्तम खरपडे, मपो अं अनूजा येलवे, चापोअं समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाकडील अंमलदार व अधिकारी यांनी केलेली आहे.