सहकार मंत्री पाटील यांनी  घेतले गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन 

सहकार मंत्री  पाटील यांनी  घेतले गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन 
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी  बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगावच्या गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच  खामगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखांचे  उद्घाटन त्यांनी केले.   यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  गजानन महाराजांच्या मंदिरात पोहोचल्यानंतर बाबासाहेब  पाटील यांचा संस्थानच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. शनिवार दिवसभर बाळासाहेब पाटील खामगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी करणार आहेत.

संबंधित बातम्या