सराईत ११ गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार.

सराईत ११ गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार.
  • MG News
  • सप्टेंबर 17 2025

Share on  

परिमंडळ एक अंतर्गत शहरातील ११ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गुन्हेगारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, चोरी, दुखापत करणे, दहशत माजवणे असे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारचे गुन्हे असलेल्यांविरुध्द कारवाई करण्यात येत आहे.

आकाश गरड (३०, रा. पंचवटी), युवराज वाघिले (१९, रा. भद्रकाली), अर्जुन लोट (२७, रा. आडगाव नाका), सागर कुमावत (३३, शितळादेवी चौक), ऋषिकेष पगारे (२८, रा. जुने नाशिक), तुषार काळे (२१, रा. मोदकेश्वर मंदिर), करण लोट (२१, रा. महालक्ष्मी चाळ), रोहित राठोड (२४, रा. शिवनेरी झोपडपट्टी), आतिश बोडके (२३, रा. फुलेनगर), सागर ताते (३४, रा. भद्रकाली), शोएब शेख (२२, रा. पिंपळचौक) यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या