खडकवासला धरणातून २हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

 खडकवासला धरणातून २हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
  • MG News
  • जून 19 2025

Share on  

पुण्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. काल मध्यरात्रीपासूनरा पुण्यात तसेच घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्याने  खडकवासला धरणातून दुपारी एक वाजता २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहता या  विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

संबंधित बातम्या