कोणत्याही पित्याच्या जीवनात आपल्या मुलीचे वेगळे स्थान असते. याच मुलीच्यामुलीच्या लग्नासाठी मुलीचा संसार सुखाचा होण्यासाठी यासाठी पिता काबाडकष्ट करतो. लग्नात मुलीच्या सासरच्या मंडळींचे मानपान करण्यासाठी, प्रसंगी कर्ज काढतो. मात्र एका पित्याला मुलीच्या लग्नासाठी बँकेने ठेवीचे पैसे न दिल्याने, जीवनच संपवावे लागण्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असणाऱ्या खळेगावात घडली आहे. छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख रुपये अडकले होते. मुलीच्या लग्नासाठी त्यांना तातडीने पैशांची गरज होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना आपली रक्कम मिळाली नाही. वारंवार विनवण्या करूनही बँक व्यवस्थापनाकडून कोणतंही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते मानसिक तणावात होते. याच तणावातून त्यांनी बँकेच्या गेटजवळ आत्महत्या केली. या घटनेनंतर खळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे