नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 23 हजार 500 सानुग्रह अनुदान

नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 23 हजार 500 सानुग्रह अनुदान
  • MG News
  • ऑक्टोबर 11 2025

Share on  

नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव करत दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सन 2025-26 करिता सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

७व्या वेतन आयोगाच्या Level S-17 व त्यापेक्षा कमी वेतन स्तरात वेतन घेणारे मनपा कर्मचारी, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, रोजंदारी/मानधनावरील कर्मचारी, सफाई कर्मचारी, बुस्टर पंपिंग कर्मचारी आणि शिक्षण विभागातील कर्मचारी यांना रु. 23,500/- (अक्षरी रुपये तेवीस हजार पाचशे फक्त) इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

तसेच शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानातून मानधन/वेतन घेणारे, 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी मनपामध्ये कार्यरत असलेले (मनपा कर्मचाऱ्यांच्या 60 टक्के )गटातील कर्मचारी यांना रु. 14,100/- (अक्षरी रुपये चौदा हजार शंभर फक्त) इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

या निर्णयासाठी मुख्य लेखा अधिकारी यांनी अंदाजपत्रक ताळमेळाचा सखोल विचार करून संबंधित प्रस्ताव मा. आयुक्त तथा प्रशासक मा. मनीषा खत्री (भा.प्र.से.) यांचेकडे सादर केला होता. मा. आयुक्त महोदयांनी संबंधित प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत सानुग्रह अनुदानास मान्यता प्रदान केली आहे.

या निर्णयामुळे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, दिपावली सण अधिक आनंदी वातावरणात साजरा करण्यास मदत होणार आहे.
 

संबंधित बातम्या