शिक्षण अधिकाऱ्यास 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल

शिक्षण अधिकाऱ्यास 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

मंगला राजीव गायकवाड धुपे (शिक्षण अधिकारी) यांनी फिर्याद दिली की, दिनांक 14 जुलै 2025 रोजी मनीष गोविंदराव भाले (राहणार भाग्यनगर जालना) हा फिर्यादी यांच्या भाग्योदय नगर जालना येथे घरी येऊन माझ्या जुन्या प्रस्तावावर सह्या करा. नाहीतर मी तुमच्या मागे संघटना लावून, तुमचे जीवन जगणे कठीण करून टाकेल. माझ्याकडे तुमची सर्व गोपनीय माहिती आहे. तुम्हाला हे सर्व थांबवायचे असेल, तर मला 25 लाख रुपये द्यावे लागतील. असे म्हणत धवकावले.
आज तालुका पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल करून, पोलिसांसमोर तक्रार नोंदवली आहे. तपास सपोनी अतुल पाटील हे करीत आहे. अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या