विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी २४ शाळांमध्ये बसवले २५६ सीसीटीव्ही कॅमेरे

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी २४ शाळांमध्ये बसवले २५६ सीसीटीव्ही कॅमेरे
  • MG News
  • जुलै 31 2025

Share on  

चंद्रपूर शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चंद्रपूर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मनपा प्रशासनाने शहरातील २४ शाळांमध्ये एकूण २५६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, शाळांच्या आवारात आता विद्यार्थ्यांवर नजर ठेवणे शक्य झाले आहे. या माध्यमातून शाळांमध्ये सुरक्षित, शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या एकूण २६ शाळांपैकी २४ शाळांमध्ये हे कॅमेरे कार्यान्वित झाले असून, उर्वरित २ शाळांमध्ये लवकरच कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
यासोबतच ऊर्जाबचत व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मनपाच्या सर्व शाळांमध्ये सौरऊर्जेवर चालणाऱ्या सोलार पॅनल्स बसवण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा बचतीची जाणीव निर्माण होईल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या