काँग्रेस नेते कैलास गोरंटयाल 31 जुलै रोजी करणार भाजपात प्रवेश

 काँग्रेस नेते कैलास गोरंटयाल 31 जुलै रोजी करणार भाजपात प्रवेश
  • MG News
  • जुलै 29 2025

Share on  

 जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल 31 जुलै रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गोरंटयाल भाजपात प्रवेश करणार आहेत. 31 जुलै रोजी दुपारी 3 वाजता गोरंटयाल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रदेश भाजप कार्यालयांत पक्ष प्रवेश होईल.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत व जालना महानगरपालिका निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचा आग्रह वरिष्ठांकडे धरणार असल्याचे गोरंटयाल म्हणाले आहेत. भाजपने महानगरपालिका निवडणुक स्वबळावर लढवावी, हे माझं वैयक्तिक मत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित बातम्या