विष्णुपुरी धरणाचे ४ दरवाजे उघडले, गोदावरी नदीपात्रात ५९ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू

विष्णुपुरी धरणाचे ४ दरवाजे उघडले, गोदावरी नदीपात्रात ५९ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

 संततधार पावसामुळे नांदेड शहरातील विष्णुपुरी धरण भरले आहे. पाण्याची वाढती आवक लक्षात घेता, धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यांमधून ५९ हजार क्युसेकस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात आहे. सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज सकाळपासून पावसाने थोडी उसंत दिली असली तरी, जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. शिवाय, हवामान खात्याने आजही नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे, आपत्ती व्यवस्थापन आणि एसडीआरएफच्या पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वी विष्णुपुरी धरणात फक्त २४% पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, गेल्या दोन दिवसांतील जोरदार पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळपासून पाऊस उघडल्याने धरणातील विसर्ग कमी करण्याची शक्यता आहे.
 

संबंधित बातम्या