नवी मुंबई : जे.एम.म्हात्रे 7 मे रोजी भाजपात प्रवेश करणार
शेकाप आणि महाविकास आघाडीवर नाराज असलेले जे.एम. म्हात्रे आता भाजपमध्ये जाण्याचा अधिकृत निर्णय घेतलेला असून, 7 मे रोजी उलवे नोड येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते पक्षप्रवेश करणार आहेत. हा कार्यक्रम स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आला आहे. या वेळी माजी मंत्री व भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत म्हात्रे आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश करतील. या पक्षप्रवेशाआधी म्हात्रे यांनी लोकनेते मा.खा. रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावर हा निर्णय घेतल्याचे समजते. या पक्षप्रवेश सोहळ्यात जे.एम. म्हात्रें बरोबर अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
जे. एम. म्हात्रे