शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.ही दुर्घटना वाशिंद आणि आमने दरम्यान पहाटेच्या सुमारास घडली.मृतांमध्ये अब्दुल पाशा शेख (वय ६५) आणि जाहीद सिद्दिकी (वय ४०) यांचा समावेश आहे. अपघातग्रस्तांमध्ये २ लहान मुले, ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश असून त्यातील दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.ही मंडळी परभणी जिल्ह्यातून भिवंडीतील नातेवाईकांकडे येत असताना हा अपघात घडला.
अपघातानंतर जखमींना तात्काळ भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.