थायलंड आणि कंबोडिया यांच्यात ८०० किमीच्या सीमेवरून अनेक वर्षांपासून वाद आहे .आता या सीमेवरून झालेल्या संघर्षात जवळजवळ एक डझनभर थाई सैनिकांचा मृत्यू झालाय .तर एक नागरिक जखमी झाल्यानंतर मोठा संघर्ष उफाळलाय . कंबोडियातील लष्करी लक्षांवर हल्ला करण्यासाठी थायलंडने अनेक लढाऊ विमाने देखील तैनात केली आहेत.
आग्नेय आशियात असणाऱ्या या दोन्ही देशांमध्ये सीमा वादाची सुरुवात सन १९०० च्या दशकाच्या सुरुवातीपासून होते . यावेळी कंबोडियावर फ्रान्सचे राज्य होते. थायलंड या काळात सियाम म्हणून ओळखले जात होते .तेव्हा ते स्वतंत्र राष्ट्र होते . १९०७ मध्ये फ्रेंच ने थायलंड आणि कंबोडिया मधील सीमारेषा निश्चित केली. मात्र यावर थायलंडने आक्षेप घेतला. दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा जपानने हा प्रदेश ताब्यात घेतला आणि या युद्धा दरम्यान थायलंडने या प्रदेशांवर पुन्हा नियंत्रण मिळवले.
तथापि, जपानने अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्यानंतर या प्रदेशांचे नियंत्रण पुन्हा एकदा कंबोडियाकडे आले. पुढील अनेक दशके या दोन्ही देशांचा सीमावाद यावरून आहे. जरी या दोन्ही देशांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले असले तरी यातून फारसे काहीही साध्य झालेले नाही हे स्पष्ट होते. आता या सगळ्यात मंदिराची मालकी हा एक गुंतागुंतीचा विषय आहे.
या दोन्ही देशांमध्ये मंदिराच्या मालकीवरूनही बराच संघर्ष होतोय. थायलंड मधील प्रेह विहार किंवा खाओ फ्रा विहारन नावाचे अकराव्या शतकातील हिंदू मंदिर दोन्ही देशांमधील वादविवादाचा विषय राहिला आहे. १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हे मंदिर कंबोडियाला बहाल केले. मात्र थायलंडने आजूबाजूच्या जमिनीवर दावा करणे सुरूच ठेवले होते.
२००८ मध्ये कंबोडियाने प्रेह विहार मंदिराला युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध करण्याचा प्रयत्न केला .यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला.
दरम्यान कंबोडिया ने ते प्रकरण संपला असून या विषयावर थायलंडशी संवाद साधण्यास नकार दिला आणि फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील तणाव पेटला. यावेळी कंबोडियन सैन्य आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वादग्रस्त भागातील एका सीमेवरील प्राचीन मंदिरात प्रवेश केला. त्या मंदिरात कंबोडियन राष्ट्रगीत गायले. ज्यामुळे थाई सैन्य आणि कंबोडियन सैन्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला.