नमस्ते नाशिक फाउंडेशन तर्फे आगळीवेगळी दिवाळी

नमस्ते नाशिक फाउंडेशन तर्फे आगळीवेगळी दिवाळी
  • MG News
  • ऑक्टोबर 30 2025

Share on  

“जिथे कमी, तिथे आम्ही” या प्रेरणादायी ब्रीदवाक्यानुसार कार्यरत असलेल्या नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक या संस्थेच्या वतीने कोपर्ली खुर्द (ता. पेठ, जि. नाशिक) येथे कष्टकरी महिला, समाजातील दुर्लक्षित घटक व गरजू शेतमजूर यांच्यासोबत एक आगळीवेगळी दीपावली साजरी करण्यात आली.
 बाजारात गर्दी पाहताना एकच प्रार्थना वाटते —"देवा, सगळ्यांची दिवाळी आनंदाची होऊ दे!"
दिवाळी म्हणजे फक्त घर सजवण्यासाठी दिवे लावणे नव्हे, तर प्रत्येकाच्या हृदयात ज्ञान, आशा आणि प्रेरणेचा दिवा प्रज्वलित करणे ही खरी दिवाळी!  या भावनेतून फाउंडेशनने “एक हात माणुसकीचा” या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गरजू लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवले. अध्यक्षा सौ. स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
समाजसेवा हीच ईश्वरसेवा
या उपक्रमात —
 कष्टकरी व गरजू महिलांना २०० हून अधिक साड्यांचे वाटप करण्यात आले.त्या साड्या स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होता. गरजू मुलींना ड्रेस, शेतमजुरांना शर्ट-पँट, लहान मुलांना मिठाई व वह्या, 
नवीन जन्म झालेल्या बालकांसाठी बेबी किट वाटप करण्यात आले
तसेच गावातील प्रत्येक घरात उजेड पसरावा म्हणून पाण्यावर चालणाऱ्या दिव्यांचे वाटप करण्यात आले.
फराळाचा आनंद सर्वांनी एकत्र घेतला आणि खऱ्या अर्थाने “माणुसकीचा सण”साजरा झाला.
 “दिवा केवळ घर उजळत नाही, तो माणुसकीचा प्रकाश पसरवतो — आणि तोच प्रकाश नमस्ते नाशिक फाउंडेशन दरवर्षी समाजात उजळवत आहे.”

संबंधित बातम्या