कुंभारपिंपळगाव येथे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद

कुंभारपिंपळगाव येथे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

जालना जिल्ह्यात पोस्टे घनसावंगी हद्दीतील कुंभारपिंपळगाव येथील ज्ञानेश्वर मधुकर दहीवाळ यांचे ज्ञानेश्वरी ज्वैलर्स येथे दिनांक २३/०७/२०२५ रोजी फिर्यादीचे दुकानाच्या चॅनेल गेटचे व शटरचे कुलूप तोडुन दुकानात प्रवेश करुन, ४ अज्ञान इंसमांनी त्यांच्या दुनाकातुन १९,७६,५०० रुपयाचे सोने चांदीचे दागिने चोरुन नेले वरुन चार अज्ञात इसमांविरुद्ध पोलीस ठाणे घनसावंगी गुरनं. ३९२/२०२५ कलम ३३१(४),३०५ (अ) भान्यासं प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सॅम्युअल कांबळे, भाऊराव गायके, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, सतिष श्रीवास, आक्रूर धांडगे, रमेश काळे, धीरज भोसले, कैलास चेके, सौरभ मुळे अशोक जाधव यांनी केली आहे.

संबंधित बातम्या