रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या एका हैदराबादच्या कुटुंबाला मारहाण

 रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या एका हैदराबादच्या कुटुंबाला मारहाण
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

नांदेडमध्ये रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या एका हैद्राबादच्या कुटुंबाला शहरातील उद्द्योजक परमेश्वर पवार, सूर्यकांत पवार यांच्या सह ८ लोकांनी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार भरदिवसा घडला आहे. कुटुंबाची कार फोडत जबरदस्तीने नेऊन रजिस्ट्री करवून घेत असल्याचा प्रकार घडत असताना  ओमप्रकाश पोकर्णा यांनी धाव घेत रजिस्ट्री रोखली. 
संबधित कुटुंब हे हैदराबादच्या एल. बी. नगरमधील रहिवाशी आहे. हैद्राबादच्या एल. बी. नगरमधील रहिवाशी असलेल्या ठाकूर कुटुंबाचे नांदेड शहराजवळील विष्णुपुरी भागात चार प्लॉट आहेत. २००९ साली त्यांनी हे प्लॉट खरेदी केले होते. त्या प्लॉटची रजिस्ट्री करून देण्यासाठी वडील, मुलगा आणि आजी नांदेडमध्ये आले होते. पण ठरलेल्या रकमेच्या २५% रक्कमच दिल्याने कुटुंबाने रजिस्ट्रीसाठी नकार दिला. कुटुंब थार गाडीतून जात असताना त्यांना आयटीआय जवळ त्यांच्या गाडीची काच फोडून त्यांना उधोजक परमेश्वर पवार, सूर्यकांत पवार यांच्या सह ८ लोकांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप या कुटुंबाने केला. जबरदस्तीने रजिस्ट्री कार्यालयात नेऊन रजिस्ट्री करवून घेतली जात होती. मात्र दरम्यान कुटुंबाने हैद्राबाद मधील राजकीय व्यक्तीशी संपर्क केला. त्या राजकीय व्यक्तीने इकडे माजी आमदार ओमाप्रकाश पोकर्णा यांना प्रकार सांगितल्या नंतर तात्काळ त्यांनी रजिस्ट्री कार्यालयात धाव घेऊन रजिस्ट्री थांबवली. त्यानंतर पोकर्णा कुटुंबाला घेऊन शिवाजीनगर ठाण्यात गेले. 

संबंधित बातम्या