देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात महा-रक्तदान शिबिर संपन्न

 देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात महा-रक्तदान शिबिर संपन्न
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेला सातारकरांनी रुग्णसेवा वृद्धिंगत व्हावी, या हेतूने या महा रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन तब्बल १००० हून अधिक सातारकरांनी रक्तदानाचे महान कार्य केले आहे आणि एक इतिहास घडवला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात महा रक्तदान शिबीर हा उपक्रम राबवला जात आहे. या अनुषंगानेच सातारा देखील महा रक्तदान शिबिराचे आयोजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. 
 या शिबिराचे उद्घाटन साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. साताऱ्यातील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महा रक्तदान शिबिरात तब्बल १००० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवून रक्तदान करत महा रक्तदानाचा इतिहास नोंदवला आहे.

संबंधित बातम्या