भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्याने युवकाचा बळी घेतलाय. युवकाचे नाव यश राजेश मोरे, (वय १८, रा. कवाड, मडक्याचा पाडा) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृताच्या नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी मृतदेह रुग्णवाहिका रस्त्यात आडवी उभी करून रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून या आंदोलनामुळे अर्धा तासापासून रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.