सांगलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा सांगलीच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सांगली जिल्हा शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी ही घोषणा केली आहे,आपल्या नेत्यांचे पुतळे हे त्यांच्या निधनानंतर उभारले जातात, मात्र त्यांच्या हयातीत पुतळे उभारले पाहिजे, म्हणून त्यांच्या हयातीतच एकनाथ शिंदे यांच्या हयातीतच हा पुतळा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे,तसेच त्यांच्या पुढील वाढदिवसाच्या आत सांगलीमध्ये हा पुतळा उभारला जाईल,असा विश्वास देखील शिवसेनेकडून महेंद्र चंडाळे यांनी व्यक्त केला आहे.