राधानगरी धरणाचे एकूण ४ स्वयंचलित दरवाजे उघडले

राधानगरी धरणाचे एकूण ४ स्वयंचलित दरवाजे उघडले
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

 राधानगरी धरण यंदाही २५ जुलै रोजी १०० टक्के भरले आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. ३ रात्री १०.०१ आणि स्वयंचलित द्वार क्र. ६ हे १०:०३ वाजता उघडले. तसेच रात्री ११.११ वाजता स्वयंचलित द्वार क्र. ५ आणि २६ जुलै पहाटे ४:३६ वाजता स्वयंचलित द्वार क्र. ४ सुद्धा उघडले आहे.
 चारही स्वयंचलित दरवाज्यांमधून ५७१२ क्युसेकस व पॉवर हाऊस मधून १५०० क्युसेकस असा एकूण ७२१२ क्युसेकस इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे.  पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या