मित्र देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून मुद्दे डायवर्ट करण्यासाठी अबू अझमी यांनी व्यक्तव्य केले-इम्तियाज जलील
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी अबू अझमी यांनी सुपारी घेतली होती हे आता जगजाहीर झालं असल्याच माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय... विधानसभेत सरकारला टार्गेट करण्यासाठी मुद्दे महत्वाचे असताना देखील मुद्दे डायवर्ट करण्यात आले असेही जलील यांनी म्हटलंय..अबू अझमी यांनी औरंगजेबावर चर्चा न करता मुसलमान कसा अडचनीत आहे हे बघावं असा सल्लाचं जलील यांनी अबू अझमीला दिलाय अबू अझमी स्वतः बॉडीगार्ड घेऊन फिरतात त्यांच्या व्यक्तव्याने सर्व सामान्य मुस्लिमांना काय त्रास होतो हे त्यांना माहित नसेल त्याचे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून मुद्दे डायवर्ट करण्यासाठी अबू अझमी यांनी व्यक्तव्य केले असल्याच माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय