नाशिक शहरातील चर्चित सरकारवाडा गोळीबार प्रकरणातील पाहिजे असलेला सराईत आरोपी लंबोदर विष्णू फसाळे यास अखेर गुन्हे शाखा अंबड पथकाने धोंडेगाव जंगल परिसरातून जेरबंद केले.
ही कारवाई पोलिस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
घटनेचा आढावा:
दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती. आरोपींनी दोन तरुणांवर गोळी झाडून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. या प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपी लंबोदर फसाळे फरार होता. त्याच्या शोधासाठी अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्यास धोंडेगाव जंगल परिसरातून अटक केली.
कारवाईत सहभागी अधिकारी:
श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त. गुन्हे, संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपुत, पोउनि. मोतीलाल पाटील, श्रेपोउनि. दिलीप सगळे, सपोउनि. सुहास क्षिरसागर, पो. हवा. प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, पोअं. भगवान जाधव, चारूदत्त निकम व मपोअं. सविता कदम, नेम. अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे.
गुन्हे शाखा अंबड पथकाने पुन्हा एकदा आपल्या जलद व अचूक तपास कौशल्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे.