खंडणीसाठी अपहरण करणारा आरोपी पुण्यातून अटकेत;निजामपूर पोलिसांची कामगिरी

खंडणीसाठी अपहरण करणारा आरोपी पुण्यातून अटकेत;निजामपूर पोलिसांची कामगिरी
  • MG News
  • ऑक्टोबर 2 2025

Share on  

खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या आरोपीला निजामपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत पुण्यातून अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. 
निजामपूर पोलीस स्टेशन येथे तक्रारदार यांनी तक्रार दिली कि, त्यांचे पती भावसिंग लालसिंग राठोड (वय-४०) यांना दिनांक ३०/०८/२०२५ रोजी लोणखेडी फाटा ता. साक्री येथून मित्राने पैसे घेतल्याच्या कारणावरुन प्रविण ओमप्रकाश राठोड याने अपहरण केले होते.  यावरुन दिलेल्या तक्रारीवरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हा फोनव्दारे अपहरण केलेल्या भावसिंग लालसिंग राठोड याच्या पत्नीकडून दिड लाखाची वारंवार मागणी करुन पैसे न दिल्यास भावसिंग लालसिंग राठोड यास जिवे ठार मारण्याच्या धमक्या देत होता. तसेच आरोपी त्याचा ठावठिकाणा वारंवार अहिल्यानगर, पुणे, कर्जत, इंदापुर याभागांमधे बदलत असल्याने आरोपीचा शोध घेणे शक्य होत नव्हते. तांत्रिक मदतीच्या आधारे प्रवीण राठोड यास गागरगांव ता. रांजनगाव, जि.पुणे येथून ताब्यात घेतले. तसेच केलेल्या चौकशीत भावसिंग राठोड यांना कर्जत तालुक्यातील पाटेगाव शिवारातील शेतात डांबून ठेवले असल्याची माहिती मिळाली आणि त्यांची सुटका करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले. 

सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे. मा. अजय देवरे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, पोनि. श्रीराम पवार, स्थागुशा धुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मयुर एस. भामरे, सपोनि प्रियदर्शनी थोरात, पोउपनि चंद्रकांत गायकवाड, पोउपनि मधुकर सोमोसे, पोउपनि यशवंत भामरे, असई पाटील (स्थागुशा धुळे), पोहेकॉ प्रदीपकुमार आखाडे, पोहेकॉ नारायण माळचे, पोहेकॉ आर.यु.मोरे, पोहेकॉ प्रशांत ठाकुर, पोकों गौतम अहिरे, मपोकों पुजा सोनवणे, पोकों परमेश्वर चव्हाण, पोकों दिपक महाले, पोकों टिलु पावरा, पोकों मुकेश दुरगुडे, पोकों श्रीराम पदमर, चापोकों मनोज माळी यांच्या पथकाने केली आहे.

संबंधित बातम्या