अफगाण नागरिकावर हल्ला; पाकिस्तानी समजून मारहाण, तिघांना अटक

अफगाण नागरिकावर हल्ला; पाकिस्तानी समजून मारहाण, तिघांना अटक
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

नागपूर शहरात एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना घडली असून, अफगाणिस्तानातून व्यवसायासाठी आलेल्या एका नागरिकावर केवळ त्याची वेशभूषा आणि भाषा पाहून हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

फहीम खान उर्फ ममतुर मरगक असे गंभीर जखमी झालेल्या अफगाण नागरिकाचे नाव असून, तो मागील सात वर्षांपासून नागपूरमध्ये व्यवसायासाठी वास्तव्यास आहे. हल्लेखोरांनी फहीम याला पठाणी पोशाख आणि उर्दू भाषेमुळे "पाकिस्तानी" असल्याचा आरोप करत शिवीगाळ केली आणि त्यानंतर सिमेंट ब्लॉकने छाती आणि डोक्यावर जबर मारहाण केली. आरोपींनी फहीमच्या गाडीवरही सिमेंट ब्लॉक फेकून नुकसान केले. अजय चौव्हाण, ऋषी आणि मयंक अशी अटकेतील अरोपींची नाव असून त्यांच्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी आरोपींवर हत्येचा प्रयत्न (कलम 307), हाणामारी व जातीय तेढ निर्माण करणारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फहीम खान सध्या गंभीर जखमी असून उपचार घेत आहे. याप्रकरणी अजय चौव्हाण हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

संबंधित बातम्या