अहिल्यानगर : शेवगाव नेवासा रोड वरील ढोरा नदीवरील पुलाचे संरक्षण कठडे मोडकळीस

अहिल्यानगर : शेवगाव नेवासा रोड वरील ढोरा नदीवरील पुलाचे संरक्षण कठडे मोडकळीस
  • MG News
  • मे 9 2025

Share on  

अहिल्यानगर : शेवगाव नेवासा रोड वरील ढोरा नदीवरील पुलाचे संरक्षण कठडे मोडकळीस 

    शेवगाव नेवासा रोड वरील जोहरापूर च्या ढोरा नदीवरील पुलाचे संरक्षण कठडे कालबाह्य झाल्यामुळे ते मोडकळीस आलेले आहेत. पुलाचे संरक्षण कठडे सुस्थितीत नसल्याकारणाने कधीही अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शेषेराव आपशेटे यांनी शेवगाव बांधकाम विभागाला याबाबत तक्रार दिली असून, तात्काळ या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या पुलाला जवळजवळ ५० वर्षे पूर्ण होत आहेत. तरी पण या पुलाची कोणत्याही प्रकारची डागडुजी केलेली नाही. त्यामुळे वाहने गेल्यानंतर पुल हादरतांना दिसत आहे.

शेषेराव आपशेटे (सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार)

संबंधित बातम्या