अहिल्यानगर : संगमनेर व अकोले तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान, शेतकरी संकटात

अहिल्यानगर : संगमनेर व अकोले तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान, शेतकरी संकटात
  • MG News
  • मे 20 2025

Share on  

अहिल्यानगर : संगमनेर व अकोले तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान, शेतकरी संकटात

             संगमनेर व अकोले तालुक्यात मागील दोन-तीन दिवसापासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून यामुळे कांदा भाजीपाला यांसह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे याचबरोबर काही जनावरे दगावली आहेत.

संगमनेर व अकोले तालुक्याला पावासाने झोडपुन काढले आहे. अकोले तालुक्यातील गणोरे येथे पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक नुकसानी  झाली आहे. संगमनेरच्या निमगाव भोजपूर ,निमज, चंदनापुरी, वेल्हाळे, सांगवी, पेमगिरी नांदुरी, राजापूर ,चिकणी,कोठे बुद्रुक,या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या भागामध्ये डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात असून या अवकाळी पावसाने डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांदा हा शेतीमध्ये डेपो बनवून साठवला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी साठवलेले कांद्याचे डेपो पूर्णपणे वाया गेले आहे.

संबंधित बातम्या