ऊस लागवडीसाठी एआय तंत्रज्ञान

ऊस लागवडीसाठी एआय तंत्रज्ञान
  • MG News
  • जुलै 3 2025

Share on  

माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात आजवर झालेला चांगला पाऊस विचारात घेता ऊस लागवडीचे धोरण चांगले राहील. त्यामुळे ऊस लागवडीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. उसाचे गाळप वेळेत होण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर सध्या यंत्रसामुग्रीच्या देखभाल दुरुस्ती कामाला वेग आला आहे, अशी माहिती मावळते अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी दिली.गणपत खलाटे, रतन भोसले, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष जगताप म्हणाले, की आगामी ऊस गळीत हंगामात आठ लाख टन ऊस माळेगावच्या कार्य क्षेत्रातून उपलब्ध होईल. कार्य क्षेत्रात १८ हजार ९०० एकर गळीतास येणाऱ्या उसाची नोंद आहे. १५ लाख टन गाळपाच्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी उर्वरित उसाची उपलब्धता गेटकेनधारकांकडून होईल. तशा पद्धतीची हार्वेस्टींगची यंत्रणा कराराद्वारे उभी करण्याचे काम सुरू आहे. प्रतिदिनी साडेनऊ हजार टन उसाचे गाळप होणे अपेक्षित आहे.

संबंधित बातम्या