नवी मुंबईतील वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे राष्ट्रीय रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी त्यांनी राजकीय प्रतिक्रिया दिली. आनंदराज आंबेडकरांना एकनाथ शिंदे यांनी महायुती सोबत आणले आहे, त्यांचे स्वागत आहे. तर एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन, मात्र ते आल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. यापूढे बोलतांना ते म्हणाले, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याचे अधिकार अजित पवार यांना आहेत. तेच याबाबत योग्य आणि लवकर निर्णय घेतील.
आमच्या समाजात गटांची संख्या जास्त आहे, हे सर्व संपुष्टात येऊन एकाच आरपीआयच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र यावे, आमची ताकद मोठी असून कुणाला सत्तेवर आणायचे हे आम्हीच ठरवतो,असे रामदास आठवले म्हणाले.